Home क्राईम संगमनेर: शिक्षकाचे घर फोडले; चार लाखांचा ऐवज लंपास

संगमनेर: शिक्षकाचे घर फोडले; चार लाखांचा ऐवज लंपास

Sangamner News: घर बंद करून शिक्षक कुटुंबासमवेत परगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी शिक्षकाचे घर फोडून ४ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास (Theft)  केल्याची घटना.

teacher's house was broken into theft instead of four lakhs

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील सारोळे पठार येथे बंद घर फोडल्याची घटना घडली आहे. घर बंद करून शिक्षक कुटुंबासमवेत परगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी शिक्षकाचे घर फोडून ४ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि. ८) सायंकाळी पाच ते शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घडली.

याप्रकरणी शिक्षक रोहिदास विष्णू घुले (वय ५३, रा. सारोळे पठार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिक्षक घुले हे कुटुंबासह पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द येथे पाहुण्यांकडे गेले होते. घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी सायंकाळी पाच ते शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडत आत प्रवेश केला. लोखंडी कपाट उचकटून मनी- मंगळसूत्र, कर्णफुले, मिनी गंठन, सोन्याचे डोरले, जोडवे, चांदीच्या पट्ट्या यांसह एकूण ४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला.

Web Title: teacher’s house was broken into theft instead of four lakhs

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here