Home अहमदनगर श्रीरामपुरातील तरुणाच्या खून प्रकरणी दोघांना 24 तासात अटक

श्रीरामपुरातील तरुणाच्या खून प्रकरणी दोघांना 24 तासात अटक

Shrirampur Murder Case:   तरुणाचा खून करणारा आरोपी व त्याचा अल्पवयीन साथीदार या दोघांना 24 तासाच्या आत पोलिसांनी अटक केली.

Two arrested within 24 hours in connection with the murder of a young man

श्रीरामपूर: शहरातील तन्वीर  शहा या तरुणाचा खून करणारा आरोपी व त्याचा अल्पवयीन साथीदार या दोघांना 24 तासाच्या आत पोलिसांनी अटक करण्यात अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

याप्रकरणी साजीद छोटु शहा (वय 26, रा. गोंधवणी रोड, दत्त मंदीराजवळ, वॉर्ड नं. 1, ता. श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुरनं. 553/2023 भादंवि कलम 302, 34 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन पसार आरोपींचा शोध घेवून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

पोलीस पथक आरोपीची माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सुनिल देवकर त्याचे साथीदारासह राहुरी रेल्वे स्टेशन परिसरात असुन कोठेतरी पळुन जाण्याच्या तयारीत आहेत.  माहिती मिळताच श्री. आहेर यांनी पथकास राहुरी रेल्वे स्टेशन परिसरात जावुन कारवाईचे आदेश दिले. पथकाने प्रवासी म्हणून वेशांतर करुन, सापळा लावुन थांबलेले असताना एक इसम साथीदारासोबत राहुरी रेल्वे स्टेशन परिसरात बसलेला दिसला. पथकाने त्यास जागीच पकडुन ओळख सांगुन त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने सुनिल सिताराम देवकर (वय 22, रा. महादेवनगर, गोंधवणी, वॉर्ड नं. 1, ता. श्रीरामपूर) व सोबत साथीदार एक विधीसंघर्षीत बालक मिळुन आला. त्यांचेकडे सदरच्या गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्या दोघांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. पथकाने त्यांना ताब्यात घेवुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे हजर केलेे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी, पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, सहाय्यक फौजदार भाऊसाहेब काळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक रविंद्र कर्डीले, संतोष लोढे, बाळासाहेब गुंजाळ, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, पोलीस कॉन्स्टेबल रणजीत जाधव, किशोर शिरसाठ, गणेश भिंगारदे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व चालक बबन बेरड व अंमलदार यांची दोन पथके नेमुन कारवाई केली.

Web Title: Two arrested within 24 hours in connection with the murder of a young man

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here