Home क्राईम संतापजनक! अंत्यविधीहून परतताना चुलत दिराचा विधवेवर अत्याचार

संतापजनक! अंत्यविधीहून परतताना चुलत दिराचा विधवेवर अत्याचार

Beed Crime News: चुलत भावाच्या मुलाच्या अंत्यविधीहून परतताना एका विधवा महिलेवर चुलत दिराने अत्याचार(abused).

Cousin Dira abused widow while returning from the funeral

बीड : चुलत भावाच्या मुलाच्या अंत्यविधीहून परतताना एका विधवा महिलेवर चुलत दिराने अत्याचार केला. ही घटना नेकनूर ठाणे हद्दीत २७ डिसेंबरला उघडकीस आली. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले असून २८ रोजी न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

पोलिसांच्या माहितीनुसार, नेकनूर ठाणे हद्दीतील एका गावातील ४० वर्षीय महिलेच्या पतीचे वर्षभरापूर्वी निधन झालेले आहे. चुलत भावाच्या मुलाचे निधन झाल्याने अंत्यविधीसाठी ती आपल्या दोन लहान मुलांसमवेत चुलत दिराच्या दुचाकीवर २० डिसेंबरला गेली होती. अंत्यविधीहून परतताना चुलत दिराने कच्च्या रस्त्यावर दुचाकी घातली. यावर पीडितेने या रस्त्यावरून गाडी का घातली, असे विचारले. मात्र, निर्जनस्थळी त्याने दुचाकी थांबवली व नंतर अत्याचार केला.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

गुन्हा नोंद होताच आरोपीला बेड्या

 नेकनूर ठाण्यात पीडितेच्या तक्रारी- वरून २७ डिसेंबरला गुन्हा नोंद करण्यात आला. लगेचच सहायक निरीक्षक विलास हजारे यांनी तातडीने पथक रवाना करून आरोपीला ताब्यात घेतले.

जिवे मारण्याची धमकी

चुलत दिराने पीडितेची दोन मुले दुचाकीजवळ थांबवली व तिला ओढ नेऊन ज्वारीच्या शेतात कुकर्म केले. याबाबत कोणाला सांगितल्यास तुला व मुलांना जिवे मारीन, अशी टोकाची धमकी त्याने दिली. पीडितेने घरी पोहोचल्यावर कुटुंबीयांना घडला प्रकार सांगितला.

Web Title: Cousin Dira abused widow while returning from the funeral

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here