Home संगमनेर संगमनेर: चाकूचा धाक दाखवून चुलते-पुतण्याला लुटले

संगमनेर: चाकूचा धाक दाखवून चुलते-पुतण्याला लुटले

Sangamner Robbed: निंबाळे चौफुलीजवळ तिघांनी चाकूचा धाक दाखविला.

Cousin-nephew was robbed at knifepoint

संगमनेर: चाकूचा धाक दाखवून चुलते-पुतण्याला लुटल्याची घटना सोमवारी (दि. १५) रात्री साडेअकराच्या सुमारास निंबाळे चौफुलीजवळ घडली. त्यांच्याकडील तीन हजार रुपये आणि दोन मोबाइल तीन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत मारहाण करत लुटून नेले.

या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. धनंजय बाबासाहेब वर्पे (रा. रहिमपूर, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लुटमार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. धनंजय वर्षे आणि त्यांचे चुलत चुलते किरण वर्पे यांना निंबाळे चौफुलीजवळ तिघांनी चाकूचा धाक दाखविला. फिर्यादी वर्पे यांच्या पाकिटातील तीन हजार रुपये, त्यांचा मोबाइल आणि त्यांचे चुलते वर्पे यांचा मोबाइल असा १६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक जाणे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Cousin-nephew was robbed at knifepoint

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here