Home अहमदनगर धक्कादायक! किल्ल्यावरील तळ्यात बुडून दोन मित्रांचा मृत्यू

धक्कादायक! किल्ल्यावरील तळ्यात बुडून दोन मित्रांचा मृत्यू

Kopargaon News:  सुट्टीचा आनंद घेण्यासाठी येवला तालुक्यातील अंकाई किल्ल्यावर गेले असता तळ्यात दोघांचा तळ्यात बुडून (Drowned) मृत्यू.

Two friends died after drowned in the fort pond

कोपरगाव: सुट्टी असल्याने कोपरगाव शहरातील तरुण सुट्टीचा आनंद घेण्यासाठी येवला तालुक्यातील अंकाई किल्ल्यावर गेले असता तळ्यात पोहोण्याचा मोह न आवरल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मिलिंद देविदास जाधव (वय 26) हा पोहण्यास गेला असता तो पाण्यात बुडाला. त्यास वाचविण्याच्या प्रयत्नांत रोहीत राठोड (वय 24) रा. सुभाष नगर याचाही बुडून मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. या घटनेने कोपरगाव शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कोपरगाव शहरातील 17 तरुणांच्या जथ्याने सुट्टीचा आनंद घेण्याचा निर्णय घेतला होता. त्या नुसार त्यांनी मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास अंकाई या प्राचीन किल्ल्याकडे कूच केले. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मिलिंद जाधव हा तेथील तळ्यात पोहण्यास गेला होता. मात्र त्यास पोहता येत नव्हते. त्यामुळे तो बुडाला असता त्याचा अन्य मित्र रोहित राठोड हा त्यास वाचविण्यास गेला. तोही पाण्यात बुडाला.

या प्रकरणी एका तरुणाने कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचेशी संपर्क साधला होता. त्यांनी येवला येथील पोलीस ठाण्यास संपर्क साधला. अंकाई येथील ग्रामस्थांनी तेथील तळ्यात धाव घेऊन त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोवर उशीर झाला होता. दरम्यान या प्रकरणी येवला पोलिसांनी या प्रकरणी सदर तरुणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी नंतर ते त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अधिक तपास येवला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील पोलीस करत आहेत. या घटनेने कोपरंगाव शहरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Two friends died after drowned in the fort pond

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here