Home अहमदनगर Murder: पतीने चारित्र्यावर संशय घेऊन गळा आवळून पत्नीचा खून  

Murder: पतीने चारित्र्यावर संशय घेऊन गळा आवळून पत्नीचा खून  

Parner Murder Case:  चारित्र्याचा संशय घेऊन शारिरिक व मानसिक त्रास.

Suspecting her character, the husband murder his wife 

पारनेर: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा गळा आवळून पतीने खून (Murder) केल्याची घटना पारनेर तालुक्यातील जवळा येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीस अटक केली आहे. न्यायालयाने त्यास १८ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

महेश भास्कर सालके (35, रा.जवळा, ता. पारनेर) असे संशयिताचे नाव आहे. तर रूपाली महेश सालके असे मयत विवाहितेचे नाव आहे.

या प्रकरणी मयत रुपालीचा भाऊ किरण भास्कर डोखे ( रा. डोणगाव, ता. वैजापुर जि. औरंगाबाद) यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हंटले आहे  की, 2011 साली संशयित महेश सोबत मयत रूपाली यांचा विवाह झाला होता. महेशला दारूचे व्यसन असल्याने तो रूपाली यांच्या चारित्र्याचा संशय घेऊन शारिरिक व मानसिक त्रास देत होता.

13 ऑगस्टला रूपाली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ते रूग्णालयात पोहोचले असता त्यांना रूपाली मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या संदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयित महेश सालके याला अटक केली. त्याला न्यायालयाने 18 ऑगस्टपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. उपनिरीक्षक हनुमंत उगले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Web Title: Suspecting her character, the husband murder his wife 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here