संगमनेर: अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्या आरोपीस ३ वर्षाची सक्त मजुरी
संगमनेर | Sangamner Crime: अल्पवयीन मुलीचा विनयभंग (molesting) केल्या प्रकरणी आरोपीस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 3 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.
संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावामध्ये एका अल्पवयीन मुलीचा आदेश भाऊसाहेब चाचण (रा. खंडेरायवाडी, ता. संगमनेर) याने विनयभंग केला होता. याप्रकरणी आदेश चाचण याच्याविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांनी तपास करत न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. आर. कदम यांच्यासमोर झाली.
सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले. सदर खटल्यात पिडीता व घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांची साक्ष महत्वाची ठरली. न्यायालयापुढे आलेल्या सबळ पुराव्यावरुन व सरकारी वकील बी. जी. कोल्हे यांनी केलेल्या प्रबळ युक्तीवाद हा ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीस भारतीय दंड संहिता 354(अ) खाली दोषी धरुन 2 वर्षे सक्त मजुरी 5 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद, तसेच बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम 8 खाली 3 वर्षे सक्त मजुरी व 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 6 महिने शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Web Title: Crime Accused of molesting a minor girl gets 3 years hard labor