Home क्राईम व्यवस्थापकाने आयटी इंजिनियर तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत बलात्कार

व्यवस्थापकाने आयटी इंजिनियर तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत बलात्कार

Rape of a young woman in a love trap

पुणे | Pune Crime: पुण्यात अहमदाबाद येथून आलेल्या आयटी इंजिनियर तरुणीला कंपनीच्या व्यवस्थापकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढत लग्नाचे आमिष देत तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून हडपसर पोलीस ठाण्यात दोन आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल कुमार सिंह आणि मालव आचार्य असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पीडित तरुणी ही अहमदाबाद येथून पुण्यात आयटी कंपनीमध्ये नोकरी करण्यासाठी आली.  या दरम्यान तिच्या कंपनीत काम करणाऱ्या व्यवस्थापकाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. आणि मी स्वतःच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट घेऊन तुझ्याशी लग्न करणार, असं आश्वासन पीडित तरुणीला दिले आणि लग्नाचे आमिष दाखवत  आरोपी राहुल कुमार सिंहने पीडित मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार (Sexual abusing) केले.

काही दिवसाने पीडित आयटी इंजिनियर तरुणीने राहुल कुमार सिंह यांच्याकडे लग्नाचा तगादा लावला. त्यानंतर राहुल कुमार सिंहने त्याचा मित्र मालवा आचार्य याच्या मदतीने पीडित मुलीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला  तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने राहुल कुमार आणि त्याचा साथीदार मालव आचार्य हे दोघेही पसार झाले आहे. ऑक्टोबर 2020 ते जून 2021 दरम्यान हा प्रकार घडला.

Web Title: Rape of a young woman in a love trap

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here