Home अहमदनगर ठेवीदाराच्या ठेवी रक्कम फसवणूक प्रकरणी या पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा

ठेवीदाराच्या ठेवी रक्कम फसवणूक प्रकरणी या पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा

Crime against the officials of this credit union in the case of fraud

नेवासा | Newasa | Crime:  परळी पिपल्स अर्बन मल्टीस्टेटमध्ये सात वर्ष ठेवलेल्या ठेवींची रक्कम मुदत संपल्यावर परत न करता वर हात केल्यामुळे ठेवीदाराने दाखल केलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालक व व्यवस्थापकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कडू भाऊराव काळे रा. नेवासा खुर्द यांनी फिर्यादी दिली असून त्यात म्हटले की, त्यांनी 2013 ते 2020 या काळासाठी पतसंस्थेत ठेवी ठेवल्या. त्यांची रक्कम 14 लाख 57 हजार रुपये परत केली नाही. संबंधित पदाधिकार्‍यांनी रक्कम मिळणार नाही काय करायचे ते करा असे म्हटले.

या फिर्यादीवरून नितीन सुभाष घुगे, विशाल एकनाथ सुरडे, योगेश बबन म्हस्के, विश्वजीत राजेसाहेब ठोंबरे, अमित झुंबरलाल गुंजाळ, अर्चना अमित गुंजाळ, अशोक रामभाऊ शेरदुरे, निलेश भाऊसाहेब टेमक, विकास सुभाष भोसले, सुधाकर सदानंद शेलार, आबासाहेब गवारे, निमीषा प्रमोद खेडकर, विजय मधुकर साबळे, भारत लक्ष्मण कोलते यांच्यावर जिल्हा न्यायालयाच्या आदेशाने भारतीय दंड विधान कलम 420, 468, 120 ब, 34, ठेवीदार वित्तीय संसाधन हितसंबंध संरक्षण अधिनियम 1999 चे कलम 3 व 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crime against the officials of this credit union in the case of fraud

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here