Home Suicide News संगमनेर ब्रेकिंग: काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

संगमनेर ब्रेकिंग: काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

Young man's body found in Katwan its murder or Suicide

तळेगाव दिघे l Sangamner:  संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

अमोल मोहनराज वामन (वय 36 वर्षे) असे या तरुणाचे नाव आहे. वडगावपान शिवारात तळेगाव दिघे प्रादेशिक पाणी योजनेचा साठवण तलाव असून नजीक रस्त्याच्याकडेला प्रचंड काटवन आहे. रस्त्याच्याकडेच्या काटवनात अमोल मोहनराज वामन या तरुणाचा मृतदेह आढळून आला.

याबाबत माहिती मिळताच वडगावपान युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश थोरात, पोलिस पाटील सुभाष थोरात यांनी घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यास माहिती देण्यात आली. पो. हे. कॉ. विष्णू आहेर, पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर यांनी घटनास्थळी येथून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथे हलविला. निलेश थोरात, उपसरपंच सोमनाथ गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिर्डे, सचिन रणधीर, नितीन गायकवाड, सलमान शेख, वसिम पठाण, आदिनाथ गायकवाड यांनी यावेळी पोलिसांना मदतकार्य केले.

अमोल मोहनराज वामन याच्या अंगात शर्ट नव्हता, त्याचा शर्ट नजीकच्या झाडाला लटकलेला होता. त्याची दुचाकीही नजीकच उभी होती. नजीक विषारी औषधाची बाटली व अन्य वस्तू आढळून आल्या. पोलिसांनी सर्व वस्तू ताब्यात घेतल्या. घटनेची माहिती मिळताच मृत तरुणाच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. हा प्रकार आत्महत्या की घातपात (murder or Suicide) याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

Web Title: Young man’s body found in Katwan its murder or Suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here