Home महाराष्ट्र कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटने चिंता वाढवली, कडक तपासणीचे आदेश

कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटने चिंता वाढवली, कडक तपासणीचे आदेश

new variant of the Coronavirus raises concerns

नवी दिल्ली | Coronavirus: दक्षिण आफ्रिका, हॉंगकॉंग आणि बोत्सवानामध्ये कोविड चे नवीन व्हेरीयंट आढळून आल्यानंतर केंद्रसरकार अलर्ट झाले आहे. केंद्राने सर्व राज्य सरकारांना परदेशातून विशेषतः या तीन देशातून येणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे आदेश दिले आहे. डब्लूएचओ देखील या व्हेरीयंट बारकाईने लक्ष ठेवून आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पत्र पाठविले असून या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, कोविड १९ चा नवीन व्हेरीयंट B.1.1529 ची  बोत्सवानामध्ये ३, दक्षिण आफ्रिका ६ आणि हॉंगकॉंगमध्ये १ रुग्णांची नोंद झाली आहे. शास्त्रज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा नवीन व्हेरीयंट मोठ्या प्रमाणात म्यूटेशन करू शकतो.

या तीन देशांशिवाय इतर काही देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर बारकाईने लक्ष देण्यास सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संपर्काचा देखील बारकाईने मागोवा घेतला पाहिजे. त्यांची चाचणी केली पाहिजे असे पत्रात म्हंटले आहे.

तज्ञ नवीन नमुना समजून घेण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करीत आहेत. लवकरच या व्हेरीयंट विषयी अधिक माहिती मिळेल.

Web Title: new variant of the Coronavirus raises concerns

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here