Home अहमदनगर साईबाबांची बदनामी करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा

साईबाबांची बदनामी करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा

Ahmednagar Crime:  आक्षेपार्ह शब्दांत साईबाबांची बदनामी करणाऱ्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

Crime against two for defaming Sai Baba

शिर्डी | Shirdi: आक्षेपार्ह शब्दांत साईबाबांची बदनामी करणाऱ्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डीचे माजी नगराध्यक्ष व साईबाबांच्या समकालीन भक्तांचे वंशज शिवाजी गोंदकर यांनी याप्रकरणी गिरधर स्वामी, (पत्ता माहिती नाही) व हिरालाल श्रीनिवास काबरा (हैदराबाद) यांच्या विरोधात शिर्डी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

३१ जानेवारीला दुपारी शिवाजी गोंदकर यांनी यू ट्यूबवर गिरधर स्वामी याने प्रसारित केलेला एक व्हिडीओ बघितला यात व्यक्तीने साईबाबांच्या विषयी आक्षेपार्ह शब्दात माहिती सांगितली होती.

धार्मिक भावना दुखावणाऱ्या व धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या अत्यंत संतापजनक प्रकारानंतर शिवाजी गोंदकर यांनी ही बाब तत्काळ शिर्डीचे आमदार व राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर महसूलमंत्री विखे यांच्या सूचनेनुसार गोंदकर यांनी तातडीने संबंधित व्यक्तीच्या विरोधात गुन्हा राजकीय संघटनांकडून दाखल करण्याचा निर्णय घेतला.

सायंकाळी उशिरा शिर्डी पोलिस ठाण्यात आरोपी गिरीधर स्वामी व हिरालाल श्रीनिवास काबरा, हैदराबाद यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावणे व धर्मा-धर्मात तेढ निर्माण करण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस उपअधीक्षक संजय सातव व पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कोकाटे पुढील तपास करत आहेत. शिर्डीतील विविध सामाजिक व या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Crime against two for defaming Sai Baba

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here