Home नाशिक सत्यजित तांबे यांचे निकालाआधीच विजयाचे झळकले पोस्टर्स

सत्यजित तांबे यांचे निकालाआधीच विजयाचे झळकले पोस्टर्स

Nashik Graduate Constituency Election: Satyajeet Tambe:  जीत’ सत्याची विजय नव्या पर्वाचा! अशा आशयाचे पोस्टर्स.

Even before the result of Satyajit Tambe, the posters showed the victory

नाशिक:  पदवीधर निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे . मात्र त्याआधी अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या विजयाचे पोस्टर्स पुण्यात झळकले आहेत. ज्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार रंगली आहे.

‘जीत’ सत्याची विजय नव्या पर्वाचा! अशा आशयाचे पोस्टर्स पुण्यात लागले आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघात भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. असे पोस्टर्स नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी लावले आहे. त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

कॉंग्रेसची बंडखोरी करत सत्यजीत तांबे जिंकणार की ठाकरेंचा पाठिंबा मिळवणाऱ्या शुभांगी पाटील बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

नगरची जागा ही मविआबरोबरच भाजपसाठीसुद्धा प्रतिष्ठेची बनली आहे. कारण भाजपनं सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना पक्षाच्या पातळीवरुन अधिकृत पाठिंबा दिला नसला, तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना मतदानाचं आवाहन केलं गेलं आहे. त्यामुळे या जागेचा निकाल सत्यजित तांबेंच्या पुढची राजकीय वाटचाल ठरवण्यात महत्वाची भूमिका निभावणार आहे.

Web Title: Even before the result of Satyajit Tambe, the posters showed the victory

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here