Home नंदुरबार अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत आत्महत्येस प्रवृत्त केल्याने दोघांवर गुन्हा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत आत्महत्येस प्रवृत्त केल्याने दोघांवर गुन्हा

Breaking News | Crime: मुलीस फूस लावून पळवून नेत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत घरात ठेवले, शारीरिक व मानसिक त्रास देत घरातून हाकलून दिले. परत घरी आलेल्या मुलीने तणावातून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना.

Crime against two for inciting suicide by abused a minor girl

नंदुरबार : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत घरात ठेवले. परंतु मुलाच्या आईने तिला शारीरिक व मानसिक त्रास देत घरातून हाकलून दिले. त्यामुळे परत घरी आलेल्या मुलीने तणावातून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना प्रकाशा येथे घडली.

याबाबत मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून मुलगा व त्याच्या आईविरुद्ध शहादा पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  मुलगी अल्पवयीन अर्थात १७ वर्ष पाच महिन्याची असल्याची माहिती असतानाही नितीन सतीश मुंगसे रा. बोराळे, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर याने मुलीला फूस लावून पळवून नेले. गावी घरी तिच्याशी जबरीने शारीरिक संबंध ठेवले. काही दिवसानंतर मुलाची आई ताईडाबाई मुंगसे यांनी मुलीला शारीरिक व मानसिक त्रास देत घरातून हाकलून दिले. त्यानंतर मुलगी गावी आई-वडिलांकडे आली. घडलेल्या घटना आणि मुलाने सोडून दिल्याने तणावात असलेल्या मुलीने घरातील मागच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत १५ दिवसानंतर मुलीच्या वडिलांनी शहादा पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार नितीन मुंगसे व ताईडाबाई सतीश मुंगसे, रा. बोराळे, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर यांच्याविरुद्ध पोस्कोसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक योगेश चौधरी करीत आहे.

Web Title: Crime against two for inciting suicide by abused a minor girl

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here