Home संगमनेर संगमनेर: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

संगमनेर: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

Breaking News | Sangamner: लग्नाचे आमिष दाखवून संगमनेरातील तरुणाने वेळोवेळी घोटी येथील एका हॉटेलात नेऊन अत्याचार केल्याचा प्रकार समोर.

Abuse of a young woman by luring her into marriage

संगमनेर: तालुक्यातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून संगमनेरातील तरुणाने वेळोवेळी घोटी येथील एका हॉटेलात नेऊन अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांत तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की शोएब अख्तार शेख या तरुणाने एका १९ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून ५ जुलै २०२३ ते २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत वेळोवेळी घोटी येथील एका हॉटेलात नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. याबाबत पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून शोएब शेख याच्यावर शहर पोलिसांत गुरनं. १८४/२०२४ भादंवि कलम ३७६ (२) (एन) नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करत आहेत.

Web Title: Abuse of a young woman by luring her into marriage

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here