संगमनेर: गावठी हातभट्टी दारुचा अड्डा उद्ध्वस्त
Breaking News | Sangamner: गावठी हातभट्टीची दारू तयार करणारा अड्डा संगमनेर शहर पोलिसांनी उद्ध्वस्त केला.
संगमनेर: तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारातील आयटीआय कॉलेजजवळ गावठी हातभट्टीची दारू तयार करणारा अड्डा संगमनेर शहर पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, गुंजाळवाडी शिवारात अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने शनिवार दि. २ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास छापा टाकला असता अनिल दशरथ माळी याच्याकडे ३ हजार ५०० रुपयांची तयार गावठी दारू आणि १५ हजार रुपयांचे कच्चे रसायन असा एकूण १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. याप्रकरणी पोकॉ. विशाल कर्पे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल माळी याच्यावर गुरनं. १८५/२०२४ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (फ) (क) (ड) (ई) नुसार गुन्हा दाखल करून मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक यांच्या भगवान मथुरे मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार लोखंडे हे करत आहेत.
Web Title: Gavathi Hatbhatti Liquor Hall destroyed
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study