संगमनेर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तरुणावर गुन्हा
Breaking News | Sangamner Crime: मुलगी अल्पवयीन असताना तिच्यावर २३ वर्षीय मुलाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस.
संगमनेर : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील एका गावात दोन वर्षापूर्वी मुलगी अल्पवयीन असताना तिच्यावर २३ वर्षीय मुलाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. जानेवारी २०२२ च्या पहिल्या आठवड्यात ही घटना घडली होती. याप्रकरणी पीडित मुलीने शुक्रवारी (दि. १६) घारगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
अनिकेत नवनाथ भुजबळ (वय २३, रा. साकूर, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. सध्या पीडित मुलीचे वय १८ वर्षे १ महिना आहे. जानेवारी २०२२ च्या पहिल्या आठवड्यात पीडित मुलगी महाविद्यालयातून घरी येत होती. त्यावेळी दुपारी १२:३० च्या सुमारास अनिकेत भुजबळ याने तिला दमदाटी केली व तो तिला उसामध्ये ओढत घेऊन गेला. तिथे पीडितेवर अत्याचार केले. तिच्या कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी सुद्धा त्याने दिली. सोबत काढलेल्या फोटोचा गैरफायदा घेतला, असेही फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक आहेर पुढील तपास करीत आहेत.
Web Title: Crime against youth in case of abused of minor girl
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study