Crime: केतकी चितळेविरोधात पारनेरमध्ये गुन्हा दाखल
पारनेर| Parner Crime; राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याविषयी सोशियल मेडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव बबनराव भोर (रा. देसवडे, ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे.
भोर यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी चितळेविरूद्ध कलम 153 सह बदनामी केल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. भोर यांनी फिर्यादीत म्हंटले आहे की, 14 मे रोजी केतकी चितळे हिने फेसबुकवर एका कवितेच्या माध्यमातून अॅड. नितीन भावे यांनी ती लिहिली आहे, असे दाखवून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबतीत आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. चितळे हिची पोस्ट जवळपास 10 ते 12 इतर लोकांनी शेअर करून तिला प्रसिद्धी दिली असल्याचे निदर्शनास आले आहे.
केतकी चितळे अभिनेत्री असून त्या माध्यमातून मिळालेल्या प्रसिद्धीचा वापर यापूर्वी तिने छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करून वादग्रस्त पोस्ट केली होती. त्याप्रमाणेच नवबौद्ध धर्माच्या व्यक्तींविरूद्धही द्वेषमूलक, आक्षेपार्ह पोस्ट केली होती. यावरून केतकी चितळे ही एक सराईत सायबर गुन्हेगार आहे व तिचे साथीदार विचारपूर्वक, जाणीवपूर्वक ब्राह्मणेतर समाजाच्या भावना दुखावण्याच्या हेतूने ब्राह्मण व ब्राह्मणेतर यांच्यामध्ये सातत्याने जातीय व धार्मिक वाद निर्माण करत आहे. या सर्वांवर गुन्हा (Crime) दाखल करण्यात यावा असेही फिर्यादीत म्हटले आहे.
Web Title: Crime Case filed against Ketaki Chitale in Parner