Home संगमनेर संगमनेर: पुणे-नाशिक महामार्गावर टेम्पो थेट महामार्गावर उलटला- Accident

संगमनेर: पुणे-नाशिक महामार्गावर टेम्पो थेट महामार्गावर उलटला- Accident

Sangamner Accident Pune-Nashik highway, the tempo reversed directly on the highway

Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव शिवारात मालवाहू टेम्पो थेट महामार्गावर उलटल्याची घटना सोमवार दि. 16 मे रोजी घडली. या अपघातात (Accident) चालक जखमी झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी सकाळी साडेआकरा वाजेच्या सुमारास मालवाहू टेम्पो वरील चालक गजानन मधुकर आठवले हे नाशिक येथून मोकळे खोके घेवून संगमनेर मार्गे पुणेच्या दिशेने जात होते. घारगाव शिवारात आले असता त्याच दरम्यान अज्ञात वाहनाने कट मारल्याने चालक आठवले यांचे टेम्पोवरील नियंत्रण सुटून टेम्पो थेट महामार्गावर उलटला.

या अपघातात चालक हे किरकोळ जखमी झाले आहे. तर टेम्पोतील मोकळे खोके हे महामार्गावर पडलेले होते. घटनेची माहिती मिळताच डोळासणे महामार्गाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सुर्यवंशी, सुनील साळवे, मनिष शिंदे, अरविंद गिरी, उमेश गव्हाणे, योगीराज सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त टेम्पो बाजूला करण्यात आला.

Web Title: Sangamner Accident Pune-Nashik highway, the tempo reversed directly on the highway

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here