Home अहमदनगर पोलीस कर्मचाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

पोलीस कर्मचाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

Crime case of molestation against a police officer

अहमदनगर | Crime Case: तोफखाना पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याने महिलेला अश्लील मेसेज पाठवून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्यानी त्याच्या विरोधात रविवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पिडीत महिलने फिर्याद दाखल केली आहे.

पोलीस नाईक रामदास जयराम सोनवणे असे या गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सोनवणे याने पिडीत महिलेच्या मोबाईलवर अश्लील मेसेज पाठविले होते. त्यानंतर पिडीत महिलेने तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी घटनेची शहनिशा करून सोनवणे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर सोनवणे याला अटक करण्यात आली आहे. तसेच तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अहवाल पाठविला आहे. याप्रकरणातील पिडीत महिला एका पोलीस कर्मचाऱ्याची आई आहे. सोनवणे हा पोलीस निरीक्षक यांचा रायटर म्हणून काम पाहत होता. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत आहे.

Web Title: Crime case of molestation against a police officer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here