Home अहमदनगर जुन्या वादातून युवकावर प्राणघातक हल्ला

जुन्या वादातून युवकावर प्राणघातक हल्ला

Sonai Assault on youth from an old argument

सोनई: सोनई येथील हनुमानवाडी येथील शानिचौकात एका तरुणावर जुन्या वादाच्या कारणातून जीवेघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याप्रकरणी सागर कुसळकर यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल राजेंद्र शेजवळ, राहुल चांगदेव शिंदे, अमोल अशोक गडाख सर्व रा. सोनई, अक्षय रामदास चेमटे रा. घोडेगाव यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून राहुल्र शिंदे यास अटक करण्यात आली आहे.

जुन्या वादाच्या रागातून सागर रामचंद्र कुसळकर रा. हनुमानवाडी या तरुणावर तलवार, चाकू, कुऱ्हाड व लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत कुसळकर याच्या हाता पायावर जबर जखमा झाल्या आहेत. यावरून चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात हे करीत आहे.  

Web Title: Sonai Assault on youth from an old argument

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here