Home संगमनेर Crime: नंग्या तलवारी घेवून समाजात दहशत निर्माण करणारा संगमनेर पोलिसांच्या जाळ्यात

Crime: नंग्या तलवारी घेवून समाजात दहशत निर्माण करणारा संगमनेर पोलिसांच्या जाळ्यात

Crime created terror in the society by carrying a naked sword, was caught by the police

संगमनेर| Sangamner Crime:  हातात नंग्या तलवारी घेवून समाजात दहशत निर्माण करणार्‍या व पोलीस पथकालाही तलवारीचा धाक दाखवून पसार झालेल्या दोघा कुख्यात गुन्हेगार भावांमधील एकास जेरबंद करण्यात संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांना यश आले आहे.

सदर प्रकार गेल्यावर्षी मार्चमध्ये घडला होता,  तेव्हापासून हे दोघेही पसार होते. मात्र बुधवारी कोल्हेवाडी रोड परिसरात पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करीत त्या दोघांतील सलीम अकबर पठाण याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पाच, तर शिर्डी पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल आहेत.

याबाबत संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी 27 मार्च रोजी आरोपी सलीम अकबर पठाण व हालीम अकबर पठाण (दोघेही रा. रामनगर, शिर्डी) हे दोन्ही कुख्यात गुन्हेगार शहरात नंग्या तलवारी नाचवून समाजात दहशत माजवित असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने घटनास्थळावर जाऊन दोघांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपल्याकडील तलवारींचा धाक दाखवित तेथून पलायन केले. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भा.दं.वी.कलम 353, 332, 34 सह भारतीय शस्त्र कायद्याचे कलम 4/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तेव्हापासून हे दोन्ही आरोपी पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

फरार आरोपींचा उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शोध घेत असताना यातील सलीम अकबर पठाण (वय 21) हा आरोपी संगमनेरातील कोल्हेवाडी रोडवरील एका पत्र्याच्या शेडमध्ये दडून बसल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलीस पथकाने सदरील शेडवर छापा घातला. पोलिसांना पाहताच वर्षभरापूर्वी नंग्या तलवारी नाचवणारा हा आरोपी तेथून धूम ठोकून पळू लागला.

मात्र पोलीस पथकाने जवळपास अर्धा किलोमीटर त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करीत अखेर त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला अटक करुन शहर पोलीस ठाण्यात आणले असता अधिक चौकशीत तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले.

Web Title: Crime created terror in the society by carrying a naked sword, was caught by the police

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here