Home महाराष्ट्र Monsoon:  यंदा मान्सून 10 दिवस आधीच धडकणार, पाहा कधी दाखल होणार?

Monsoon:  यंदा मान्सून 10 दिवस आधीच धडकणार, पाहा कधी दाखल होणार?

Monsoon News 10 Day before

मुंबई | Monsoon News:  शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा मान्सून देशात लवकरच येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 10 दिवस आधीच मान्सून धडकणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  21 मे रोजी केरळच्या किनाऱ्यावर मान्सून धडकणार असल्याची माहिती एका संस्थेने दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांसह उकाड्याने हैराण झालेल्या सगळ्यांनाच दिलासा मिळणार आहे.

अंदमान समुद्रावरील वातावरण बदलामुळे आणि कमी होणाऱ्या हवेच्या दाबाच्या स्थितीमुळे मान्सून वेळेवर सुरु होण्यास मदत होईल,  अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तविली आहे. या महिन्यात अंदमान समुद्रात निर्माण होणाऱ्या कमी दाबामुळे मान्सूनच्या प्रगतीला मदत होणार आहे.

मान्सून, साधारणपणे 1 जूनच्या आसपास केरळमध्ये येत असतो आणि जुलैच्या मध्यापर्यंत उर्वरित भारत व्यापतो, भारताच्या वार्षिक पावसाच्या सुमारे 70 टक्के पाऊस पाडतो. भारतातील जवळपास 40 टक्के निव्वळ पेरणी मान्सूनवर अवलंबून असते. भारतातील निम्मे शेती उत्पादन मान्सूनवर अवलंबून असल्याने वेळेआधी मान्सून दाखल होत असल्याने याचा चांगलाच फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

Web Title: Monsoon News 10 Day before

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here