Home अकोले बनावट कागदपत्रे बनवून संगमनेरातील पतसंस्थेस फसविले, अकोलेतील उद्योजक अटकेत

बनावट कागदपत्रे बनवून संगमनेरातील पतसंस्थेस फसविले, अकोलेतील उद्योजक अटकेत

Crime Entrepreneur arrested in Akole for cheating credit union in Sangamner

Ahmednagar Sangamner Crime | संगमनेर: अकोले येथील एका उद्योजकाने कर्जासाठी गहाण ठेवलेल्या जमिनीवर कुठलाच बोजा नाही व जमीन कोठेच गहाण नाही असे दाखवत खोटे कागदपत्रे बनवून संग्राम सहकारी पतसंस्थेतून लाखो रुपयांचे कर्ज काढले. ही फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संग्राम पतसंस्थेने उद्योजकावर गुन्हा दाखल केला आहे.

प्रवीण विलास देशमुख रा. नवलेवाडी ता. अकोले असे अटक केलेल्या उद्योजकाचे नाव आहे. त्याची पत्नी व बनावट कागदपत्रे तयार करणारा त;तलाठी मात्र पसार झाला आहे. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

अकोले तालुक्यातील औरंगपुर येथील सर्वे नंबर १/१ मधील मिळकत सहकारमहर्षी अमृतवाहिनी बँकेकडे २०१३ साली गहाण ठेवण्यात आली आहे. तरीदेखील आरोपीने बनावट कागदपत्रे तयार करून, सरकारी दप्तरात फेरफार करत ही जमीन कोणाकडे गहाण नाही असे खोटे भासवून संग्राम बँकेकडून कर्ज मिळविले. ही घटना २०१६ रोजी घडली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात संग्राम बँकेचे व्यवस्थापक उमेश सुखदेव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करणयात आला आहे. सदर गुन्हा आता पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्याकडे तपासासाठी आला असता त्यांनी कडक कारवाई करत अकोले तालुक्यातील उद्योजक प्रवीण विलासराव देशमुख याना अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील आरोपी देशमुख याची पत्नी आणि तलाठी गुलाब विठोबा बारामते रा. धुमाळवाडी ता. अकोले हे अद्याप फरार आहेत.

Web Title: Crime Entrepreneur arrested in Akole for cheating credit union in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here