Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील या पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

अहमदनगर जिल्ह्यातील या पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Two employees of the shrirampur police station caught by the Bribe Prevention Department

Ahmednagar | Shrirampur Bribe | श्रीरामपूर:  एका गुन्ह्यांमध्ये सहकार्य करण्यासाठी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले दोन कर्मचारी लाच घेताना जेरबंद करण्यात आले आहेत. पोलीस हवालदार सुनिल वाकचौरे व पोलीस शिपाई गणेश ठोकळ हे दोन कर्मचारी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली.

या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी एका गुन्ह्यांमध्ये सहकार्य करण्यासाठी शहरातील एका तक्रारदाराकडून १५ हजारांची लाच मागितली होती व तडजोडी अंती १० हजार रुपयांची लाच श्रीरामपूर बस स्थानकाजवळ स्वीकारली. त्यावेळेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर छापा टाकत दोघांना पकडले आहे. याप्रकरणी  दोन्ही कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरु आहे.

Web Title: Two employees of the shrirampur police station caught by the Bribe Prevention Department

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here