Home महाराष्ट्र धक्कादायक! जवानांची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येनं खळबळ

धक्कादायक! जवानांची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येनं खळबळ

Hingoli Suicide by strangulation of soldiers

Hingoli | हिंगोली: हिंगोलीमध्ये राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  या घटनने खळबळ उडाली आहे. आत्महत्या मागील नेमके कारण अद्याप समोर आले नाही.

दिनेश बाळासाहेब मुलगीर असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे.  ते हिंगोलीच्या राज्य राखीव पोलीस दलातील बल गट क्रमांक 12 येथे कार्यरत होते. सध्या दिनेश हे गडचिरोली जिल्ह्यातील राजाराम खंडाला विभागामध्ये कर्तव्यावर होते.

दरम्यान दिनेश हे पाच दिवसांच्या सुटीवर गावी आले होते. आज सकाळी त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या प्रकरणी बाळापूर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.  या जवानाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Hingoli Suicide by strangulation of soldiers

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here