Home अहमदनगर अहमदनगर: पोलीस ठाण्याच्या आवारातच तुंबळ हाणामारी, सात जण ताब्यात

अहमदनगर: पोलीस ठाण्याच्या आवारातच तुंबळ हाणामारी, सात जण ताब्यात

Crime Fighting broke out in the premises of the Rahuri police station

राहुरी | Rahuri Crime:  राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारातच  दि. 19 फेब्रुवारी रोजी दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली.  यावेळी पोलिसांनी दोन्ही गटातील सात गजाआड केले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

बारागांव नांदूर येथील दोन गटात कोणत्यातरी कारणावरून वादातून दोन्ही गटातील 15 ते 20 जण राहुरी पोलीस ठाण्यात आले. त्याठिकाणी पोलीस ठाण्याच्या आवारात त्यांच्यात बाचाबाची होऊन दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी झाली.  दोन्ही गटाकडून एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) करण्यात आली. पोलिसांनी ताबडतोब हस्तक्षेप करत दोन्ही गटातील लोकांना ताब्यात घेतले.

वाचा: Ahmednagar News

या बाबत पोलीस नाईक गणेश फाटक यांनी फिर्याद नोंदवली. त्यानुसार एका गटातील शरद पांडुरंग आघाव, पांडुरंग संभाजी आघाव, रा. तिळापूर ता. राहुरी, पोपट रोहिदास आघाव रा. बारागांव नांदूर, दुसर्‍या गटातील राजेंद्र बाजीराव आघाव, विजय बाजीराव आघाव, कोंडाजी रामदास आघाव, बाजीराव रंभाजी आघाव सर्व रा. बारागांव नांदूर अशा दोन्ही गटातील एकूण 7 जणांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी मारामारी करून शांतता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक  तपास पोलीस नाईक शिवाजी खरात हे करीत आहेत.

Web Title: Crime Fighting broke out in the premises of the Rahuri police station

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here