Home अहमदनगर संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

Woman killed in Bibatya attack in Sangamner taluka

Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावात दुर्दैवी घटना घडली आहे. मेंढवण शिवारातील कारथळवाडी येथे बिबट्याने हल्ला केल्याने महिलेचा गळ्यावर जखमा झाल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

हिराबाई एकनाथ बढे ( वय 45 वर्ष ) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

मेंढवण शिवारातील कारथळवाडी येथे राहत असलेल्या हिराबाई बढे या रात्री घराबाहेर निघाल्या असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केल्याने त्यांच्या गळ्याला बिबट्याच्या दातांच्या खोलवर जखमा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता.

या घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल सागर माळी, वनपाल प्रशांत पुंड, वनरक्षक संतोष पारधी, एस. बी. सोनवणे सहित वन कर्मचार्‍यांनी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी लोणी येथे धाव घेत माहिती घेतली. बिबट्याने हल्ला केल्याने हिराबाई बढे यांच्या गळ्यावर खोलवर जखमा झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वनपाल प्रशांत पुंड यांनी सांगितले. या घटनेने मेंढवण परिसरात शोक व्यक्त होत आहे.

Web Title: Woman killed in Bibatya attack in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here