Home क्राईम संगमनेर: पहिले लग्न लपवून दुसऱ्या महिलेसोबत लग्न- Crime

संगमनेर: पहिले लग्न लपवून दुसऱ्या महिलेसोबत लग्न- Crime

Sangamner Crime:पहिल्या पत्नीला पती व सासर्‍याने त्रास दिल्याने सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

Crime Filed Marriage with second woman after concealing first marriage

संगमनेर: संगमनेर शहरात नाईकवाडपुरा येथे लग्न लपवून दुसरीसोबत लग्न केल्याची घटना समोर आली आहे. पहिले लग्न लपवून दुसर्‍या महिलेसोबत लग्न करून पहिल्या पत्नीला पती व सासर्‍याने त्रास दिल्याने सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील नाईकवाडपुरा येथील अतीफ शेख याचे लग्न झालेले होते. पहिले लग्न झालेले असतानाही त्याच्या परिवाराने हे लग्न लपवून अतिफ याचे दुसर्‍या महिलेसोबत लग्न केले. सासरे अमीर शेख यांनी सुनेला शिवीगाळ करून धमकी दिली. तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने नणंदेने काढून घेतले. ही घटना बुधवारी नाईकवाडपुरा येथे घडली.

याबाबत सानिया आतिफ शेख (वय 21) हिने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी आतिफ अमीर शेख, अमिर इब्राहीम शेख, मनसुर शेख तिघे रा. नाईकवाडपुरा, संबुरा मोहसीन शेख, तस्लिम फहीम शेख, अतिरा सदाम शेख यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 857/2022 भादंवि कलम 498(अ), 504, 506, 323, 494, 406 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस नाईक गायकवाड करीत आहेत.

Web Title: Crime Filed Marriage with second woman after concealing first marriage

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here