Home क्राईम मूकबधिर मुलीवर अत्याचार; मुख्याध्यापकासह दोघांविरुद्ध गुन्हा 

मूकबधिर मुलीवर अत्याचार; मुख्याध्यापकासह दोघांविरुद्ध गुन्हा 

Sangamner Girl abuse:मुलीच्या गुप्तांगाजवळ जखमा आढळून आल्या.

Sangamner Abuse of a deaf and dumb girl

संगमनेर: येथील एका मूकबधिर विद्यालयात इयत्ता सातवीत शिकणाऱ्या लहान मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मुख्याध्यापकासह एक अज्ञात व्यक्तीविरुद्ध बाल लैंगिक गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या मुलीच्या गुप्तांगाजवळ जखमा आढळून आल्या. नंतर तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार करूनही फरक पडेना म्हणून संशय आल्याने मुलीच्या नातेवाइकांनी तक्रार दाखल केली आहे.

संबंधित मुलीच्या मामाने या बाबत फिर्याद दिली आहे, मात्र पोलीस माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मूळची राहता तालुक्यातील रहिवासी असलेली ही मुलगी संगमनेरमधील एका मूकबधिर विद्यालयात शिकत आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी तिच्या गुप्तांगाजवळ जखमा आढळून आल्यानंतर तिच्यावर विद्यालयाच्या वतीने स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र जखमा बऱ्या होत नसल्याने एका शिक्षिकेने संबंधित मुलीच्या आई-वडिलांना फोन करून तिला उपचारासाठी घेऊन जाण्यास सांगितले. तिचे आई वडील तिच्या मामाला सोबत घेऊन संगमनेरला आले.

तेथील मुख्याध्यापक यांनी त्वचेचे इन्फेक्शन झाले असावे असे सांगितले. नातेवाइकांनी मुलीला लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे काही उपचार केल्यानंतर मुलीला अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्यास येथील डॉक्टरांनी सांगितले. नंतर संबंधित मुलीला नातेवाइकांनी नगरच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र संशय बळावल्याने त्यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून त्या विद्यालयातील मुख्याध्यापकासह एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध बाल लैंगिक गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Sangamner Abuse of a deaf and dumb girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here