अहमदनगर जिल्ह्यात या तालुक्यात जोरदार पाउस, पूरस्थिती
Ahmednagar Newasa News: नेवासा तालुक्यात मुसळधार पाउस (Heavy rain), तीन ते चार इंच पाउस ओढे नाल्यांना पूर (flood).
नेवासा: तालुक्यात गुरुवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. कमी वेळेत सुमारे ३ ते ४ इंच पाऊस झाल्याने अनेक ओढे-नाल्याना पूर आल्याने वाहतूक बंद होऊन गावांचा संपर्क तुटला होता. तर ऊस, मका, कडवळ, कपाशी, सोयाबीन पिकात मोठे प्रमाणात पाणी साचून आहे.
गुरुवारी रात्री सुरू झालेला पाऊस सकाळी उशिरा पर्यंत सुरू होता. तालुक्यातील काही गावांमध्ये ७५ ते १०० मिलिमीटर पेक्षाही जास्त पाऊस झाल्याचा अंदाज आहे. बऱ्याच दिवसानंतर ओढ्या-नाल्याना पूर येऊन दुथडी वाहिले आहेत.
नेवासा-शेवगाव रस्त्यावरील भेंडा-सौंदाळा येथील रस्ता, भेंडा बुद्रुक व भेंडा खुर्द, भेंडा-जेऊर, भेंडा-देवगाव, भानसहिवरे-नेवासा, भानसहिवरे-रांजणगाव, नेवासा-खडका, देवगाव-फत्तेपुर, कौठा-फत्तेपुर, कुकाणा-दहीगाव रस्त्यावरील ओढे पाण्याची पातळी सोडून वाहत होते. त्यामुळे या सर्व रस्त्यावरील वहातुक काही काळासाठी बंद होती. तालुक्यात कुठे ही जीवित वा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही.
Web Title: Heavy rain, flood situation in Newasa taluka in Ahmednagar