Home क्राईम Crime: होर्न का वाजविला असे विचारल्याने एकास बेदम मारहाण  

Crime: होर्न का वाजविला असे विचारल्याने एकास बेदम मारहाण  

Crime Filed One was beaten to death for asking why the horn was blown

श्रीरामपूर | Crime: श्रीरामपूर शहरात बाजारतळ भागात एमजीएम भंगार दुकानासमोर गाडीचा हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून एक़ास लोखंडी पाईपने हातावर व पायावर मारुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोघा जणांविरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील एका जणास अटक केली असून एक जण पसार झाला आहे.

शहरातील बाजारतळ भागात एमजीएम भंगार दुकानासमोर महेंद्र झायलो (गाडी नं. एमएच 20 सीएच 5475) हिच्यामधून जाणारे किरण धोत्रे, सागर म्हस्के, यांनी गाडीचा हॉर्न वाजविला. तेव्हा तेथे असलेला समीर लतीफ पिंजारी (वय 24) रा. वॉर्ड नं. 2, नवी दिल्ली, श्रीरामपूर हा म्हणाला की, तुम्हाला जाण्यासाठी रस्ता रिकामा आहे. हॉर्न वाजवू नका, असे म्हटल्याचा राग आल्याने दोघा जणांनी शिवीगाळ करीत आज तुझा शेवटचा दिवस आहे, तुला संपवून टाकतो, असे म्हणत भंगारच्या दुकानासमोर पडलेला लोखंडी पाईप घेऊन हातावर व पायावर मारला. अंगावर धावून जाऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये लतीफ याच्या हाताला जखम झाली. तसेच जाताना तू आज वाचला परत आमच्या नादी लागलास तुला जीवे ठार मारू अशी धमकी दिली.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात समीर लतीफ पिंजारी या तरुणाने फिर्याद दिली आहे.  यावरून पोलिसांनी किरण धोत्रे, सागर म्हस्के, (दोघे रा. बाजारतळ, वॉर्ड नं. 3 श्रीरामपूर) यांच्याविरूद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.  याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पोलीस सहायक निरीक्षक घायवट हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Crime Filed One was beaten to death for asking why the horn was blown

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here