Home अहमदनगर शाळकरी  मुलीचा विनयभंग, रोडरोमिओंवर गुन्हा दाखल

शाळकरी  मुलीचा विनयभंग, रोडरोमिओंवर गुन्हा दाखल

Ahmednagar Crime: भरोसा पथकाची कारवाई , ३० वर्षीय तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल, रस्त्यात अडवून छेड.

Crime has been registered against Rodromio for molesting a school girl

अहमदनगर: शहरातील एका शाळेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिची छेड काढल्याप्रकरणी एका ३० वर्षीय तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. १०) दुपारी घडली.

एका १५ वर्षीय शाळकरी मुलीला गेल्या काही दिवसांपासून एकजण त्रास देत होता. आरोपी व त्याचा मित्र हे दोघे शाळेतील मुलीसोबत फोनवरून बोलत असत. पीडितेची मैत्रिणदेखील त्यांच्यासोबत बोलत होती. यातून पीडित मुलगी व एका ३० वर्षीय मुलाची ओळख झाली.

मात्र, पीडिता त्याच्यासोबत बोलत नव्हती. परंतु, मैत्रिणीने त्याच्याशी बोलत जा काही होत नाही. बोलायला काय लागते, असे म्हणून तिने पीडित मुलीला बोलण्यास भाग पाडले. त्यानंतर तो तिच्याशी जवळीक वाढवू लागला. फोनवरून मेसेज पाठवू लागला. मुलीच्या आई-वडिलांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी संबंधित तरुणाचा शोध घेऊन त्याला समजावण्याचा प्रयत्नही केला. परंतु, त्यानंतरही त्याने मुलीला त्रास देणे सुरूच ठेवले.

त्यामुळे आई-वडिलांनी पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी तरुणाचा शोध घेऊन त्याच्यावर भादंवि कलम ३५४ नुसार कारवाई केली आहे.

दिलासा पथकाच्या शाळांना भेटी

हा प्रकार घडल्यामुळे दिलासा पथकाच्या प्रमुख पोलीस निरीक्षक पल्लवी देशमुख यांनी शहरासह उपनगरांतील शाळांना भेट देऊन मुलींशी संवाद साधला. शाळेबाहेरील मुले त्रास देत असतील तर थेट भरोसा सेलशी संपर्क करा, असे आवाहन त्यांनी शाळेतील मुलींना केले.

Web Title: Crime has been registered against Rodromio for molesting a school girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here