Home क्राईम संगमनेर: हद्दपार असलेल्या युवकावर गुन्हा दाखल

संगमनेर: हद्दपार असलेल्या युवकावर गुन्हा दाखल

Sangamner Crime: युवक कालावधी संपण्याआधीच संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळून आल्याने त्याच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

Crime has been registered against the deported youth

संगमनेर:  नगर जिल्ह्यातून हद्दपार असताना देखील संगमनेर शहर परिसरात आढळून आल्याने संगमनेर पोलिसांनी कारवाई केली आहे. युवक हा संगमनेर शहरात गंगामाई घाट येथे पोलिसांना आढळून आला.

याबाबत अधिक माहिती अशी की,  राहुल सोनवणे (२२, रा. अकोले नाका, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. मंगळवारी (दि. १८) संध्याकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास सोनवणे हा संगमनेर शहरात गंगामाई घाट येथे पोलिसांना आढळून आला. नगर जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार केलेला युवक कालावधी संपण्याआधीच संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळून आल्याने त्याच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crime has been registered against the deported youth

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here