Home क्राईम संगमनेर घटना: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वारंवार अत्याचार

संगमनेर घटना: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वारंवार अत्याचार

Crime News atrocities on women by showing the lure of marriage

संगमनेर | Crime News: एका ४७ वर्षीय विधवा महिलेशी झालेल्या ओळखीतून तिला लग्नाचे आमिष दाखवून एका ५८ वर्षीय व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या व्यक्तीविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेणुनाथ वामन ठोंबरे वय ५८ रा. इंदिरानगर ता. संगमनेर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.  

पिडीत महिला विधवा असल्याचे माहित असताना देखील ठोंबरे याने २०१७ ते १० मे २०२१ पर्यंत वारंवार लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. विश्वास संपादन करून इच्छा नसताना शरीरसंबध केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे या अधिक तपास करीत आहे.

Web Title: Crime News atrocities on women by showing the lure of marriage

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here