Home क्राईम संगमनेर: सरकी पेंडमधून गायींवर विषप्रयोग केल्याने दोन गायी मृत्यू, गुन्हा दाखल

संगमनेर: सरकी पेंडमधून गायींवर विषप्रयोग केल्याने दोन गायी मृत्यू, गुन्हा दाखल

Crime News Two cows die due to poisoning

संगमनेर | Crime News:  संगमनेर तालुक्यातील खांडगाव शिवारात सरकी पेंडमधून दोन गायींवर विषप्रयोग करण्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये दोन गायींचा औषधोपचार सुरु असताना दगावल्या आहेत. बुधवारी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर संपत गुंजाळ असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पत्नी इंदुबाई ज्ञानेश्वर गुंजाळ रा. खांडगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी इंदुबाई, तिचा पती, मुलगा व मुलगी यांच्यासमवेत खांडगाव शिवारात राहतात. उदरनिर्वाहसाठी त्यांच्याकडे दोन गायी आहेत. पती कुठलाही काम धंदा करत नाही.

बुधवारी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास इंदुबाई या गायींना चार घालण्यासाठी गेल्या असता त्यांचा पती ज्ञानेश्वर याने प्लास्टिकच्या टोकरीत दोन्ही गायींना सरकी पेंड घातली होती. त्यामुळे त्यांनी गायींना चारा घातला नाही. काही वेळाने गायी थरथर कापून खाली पडल्या. इंदुबाई यांनी तेथे जाऊन पाहिले असता त्यांना मका पिकावर फवारणीसाठी आणलेली कीटकनाशकाची बाटली पडलेली दिसून आली. गायींना वाचविण्यासाठी पशुवैद्यकांना बोलाविण्यात आले. उपचार सुरु असताना दोन्ही गायींचा मृत्यू झाला. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित महाजन हे अधिक तपास करीत आहे.

Web Title: Crime News Two cows die due to poisoning

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here