संगमनेरातील घटना: अल्पवयीन मुलीवर पित्याकडून तीन वेळा लैंगिक अत्याचार
संगमनेर | Crime News: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका वाडीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोटच्या ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आई वडिलांसोबत राहणाऱ्या ११ वर्षीय पिडीत अल्पवयीन मुलगी रहाते. पिडीतेची आई बाहेरगावी गेली होती. या कालावधीतच २ जुल रात्री, २८ जुलै रात्री आणि यानंतर दोन आठवड्यानंतर असे तीन वेळा पित्याने आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. मुलगी झोपलेली असताना अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.
याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने बुधवारी फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ आरोपीस अटक केली. त्यास आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले हे पुढील तपास करीत आहे.
Web Title: Crime News Sangamner Three times sexual abuse by a father on a minor girl