Crime News: त्या अश्लील गुरुजीची रवानगी पोलीस कोठडीत
अहमदनगर | Crime News: विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविणाऱ्या नगर जिल्ह्यात शिक्षक विद्यार्थी नात्याला काळिमा फासणारी घटना घडली. शिक्षकाने विद्यार्थिनीचा शाळेत विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
शाळेच्या विद्यार्थिनीना शाळेत बोलावून अश्लील चाळे करणारा जिल्हा परिषद शाळेतील गुरुजी संतोष एकनाथ माघाडे वय ३४ रा. गंगापूर जि. औरंगाबाद याला न्यायालायाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
त्याच्या विरोधात पालकाच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
नगर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये माघाडे गुरुजी शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थिनीना बोलावून घेत असे व त्यांच्याशी अश्लील चाळे करत असल्याची बाब उघडकीस आली आहे. विद्यार्थिनीने हा प्रकार पालकांना सांगितल्याने नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Crime News obscene Guruji was sent to the police cell