Crime News: घरात घुसून महिलेचा विनयभंग: तिघांवर गुन्हा
राहुरी |Crime News| Rahuri: राहुरी तालुक्यात एका तरुण विवाहित महिलेशी धक्काबुकी करून तिघा जणांनी तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची घटना घडली आहे. सदर घटना दि. 10 डिसेंबर रोजी त्या महिलेच्या घरात घडली. याप्रकरणी राहुरी तालुक्यातील तिघा जणांविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ती विवाहित महिला दुपारी चार वाजेच्या सुमारास तिच्या घरातील पडवीमध्ये होती. त्यावेळी आरोपी हे दारूच्या नशेत मोटारसायकलवर बसून तिच्या घरी आले. त्यावेळी आरोपी तिला म्हणाले, तुझा पती कोठे आहे? त्याला आम्हाला दीड लाख रुपये द्यायचे आहेत. तेव्हा महिला म्हणाली, तुमचा व्यवहार तुम्ही त्यांच्या सोबत पाहून घ्या. त्याचा राग आल्याने आरोपींनी तिला शिवीगाळ केली. तेव्हा ती महिला तिच्या आजी सासूला बोलाविण्यासाठी घरात गेली. तेव्हा आरोपींनी तिच्या घरात जाऊन तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच यावेळी आरोपी तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.
त्या महिलेने राहुरी पोलिसात जाऊन घडलेला प्रकार सांगितला. तिच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात आरोपी संकेत बाबासाहेब मोरे, अभिजीत शिवाजी मोरे, आकाश राजेंद्र बेलकर सर्व रा. तांदूळवाडी या तिघा जणांवर विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Crime News Breaking into a house and molesting a woman