Home महाराष्ट्र राज्यात चिंता वाढली; या जिल्ह्यातही ओमिक्रॉनचा शिरकाव

राज्यात चिंता वाढली; या जिल्ह्यातही ओमिक्रॉनचा शिरकाव

Corona update News omicron in Nagpur

नागपूरः | Corona update News:  मुंबई आणि पुण्यात ओमिक्रॉन या व्हेरियंटचा शिरकाव झालेला होता. आता उपराजधानी नागपूरमध्येही शिरकाव केला आहे. नागपूर महानगर पालिका आयुक्त राधाकृष्णन यांनी याबाबतमाहिती दिली आहे.

आरोग्य विभागाकडून व प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.   तरीसुद्धा ओमिक्रॉन व्हेरियंचे रुग्ण राज्यात वाढत असल्याचे चित्र आहे. नागपूर येथेही आता ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालेला रुग्ण आढळल्याने आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे.

नागपूरमध्ये ४० वर्षीय व्यक्तीला ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचं पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितलं आहे. ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळलेल्या हा ४० वर्षीय रुग्णाचा पश्चिम आफ्रिकेतील प्रवास केल्याचा सांगितले आहे. हा व्यक्ती नागपुरात परतल्यानंतर त्याची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर या रुग्णांचे अहवाल जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतरच त्याला ओमायक्रोन संक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याची प्रकृती स्थिर असून उपचार सुरु आहेत. त्याच्या संपर्कातील नागरीकांचो ट्रेसिंग केली जात आहे.

Web Title: Corona update News omicron in Nagpur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here