Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात ओमिक्रॉनचा धोका वाढला: हाय रिस्क देशातून प्रवाशी जिल्ह्यात दाखल

अहमदनगर जिल्ह्यात ओमिक्रॉनचा धोका वाढला: हाय रिस्क देशातून प्रवाशी जिल्ह्यात दाखल

Ahmednagar News Today about omicron variant 

अहमदनगर | Ahmednagar News Today: देशात ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. आजच नागपूर जिल्ह्यात शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे. यातच आता अहमदनगर  जिल्ह्यात चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांत एकूण 156 आंतरराष्ट्रीय प्रवासी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यामध्ये तब्बल 86 प्रवासी ओमिक्रॉनचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातून आले आहेत.

त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात ओमिक्रॉनचा धोका वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवारी आणखी 24 प्रवाासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून नगर जिल्ह्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 156 आंतरराष्ट्रीय प्रवासी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यामधील 130 जणांचा शोध घेण्यात आला आहे. पण उर्वरित 26 जणांचा उद्याप शोध सुरू आहे. अद्याप 9 प्रवाशांच्या कोरोना चाचणीचा अहवाल येणं बाकी आहे. ओमिक्रॉन संसर्गाच्या तोंडावर आंतरराष्ट्रीय प्रवासी गायब झाल्याने जिल्ह्याची चिंता वाढताना दिसत आहे. ओमिक्रॉनच्या हाय रिस्क देशांची यादीही प्रशासानाकडून जारी करण्यात आली होती.

परदेशातून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करणं बंधनकारक केलं आहे. अशात नगर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 156 प्रवासी दाखल झाले आहेत. यातील 121 जणांची चाचणी करण्यात आली असून त्यांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Web Title: Ahmednagar News Today about omicron variant 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here