Home अहमदनगर Theft: चोरटयांनी फिल्मी स्टाईलने एटीएम फोडले, लाखो रुपये लंपास

Theft: चोरटयांनी फिल्मी स्टाईलने एटीएम फोडले, लाखो रुपये लंपास

Rahata taluka Filmy style ATM Theft

राहता | Theft: राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे नगर मनमाड रोडच्याकडेला असलेले इंडीया कंपनीचे एटीएम अज्ञात चोरटयांनी फिल्मी स्टाईलने फोडले असल्याची घटना घडली आहे. त्यातुन 1 लाख 64 हजारांची रोकड लंपास केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पिंपरी निर्मळ येथील माहामार्गाच्या कडेला व वर्दळीच्या ठीकाणी असलेले हे खाजगी इंडिया कंपनीचे एटीएम चोरटयांनी गॅस कटरच्या साहयाने फोडले आहे. चोरटयांनी फिल्मी स्टाईलने सुरू असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यावर कलरचा स्प्रे मारला तसेच रेकॉडींग केलेली हॉर्ड डीस्कही घेवुन पोबरा केला.

तसेच एटीएम मधील 1 लाख 64 हजारांची रोकड लंपास (Theft)केली आहे. गावात प्रथमच भर चौकात पडलेल्या दरोडयामुळे ग्रांमस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. लोणी पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक समाधान पाटील यांनी घटना स्थळाला तातडीने भेट दिली आहे. याबाबत अधिक तपास पोलिसानी सुरु केला आहे.

Web Title: Rahata taluka Filmy style ATM Theft

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here