Home अकोले अकोले तालुक्यात गांजाची शेती, अडीच लाखाची गांजाची झाडे ताब्यात

अकोले तालुक्यात गांजाची शेती, अडीच लाखाची गांजाची झाडे ताब्यात

Crime News Cannabis cultivation in Akole taluka

अकोले | Crime News: अकोले तालुक्यातील वारांघुशी गावातील कळम देविवाडी येथील डोंगर दरीत काही शेतकऱ्यांनी गांजाची शेती केल्याची माहिती राजूर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे राजूर पोलीत्यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली. स स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे व त्यांच्या पथकाने रस्ता नसल्याने रस्त्याने पायी जात गांज्याच्या शेतीचा छडा लावत कारवाई करून तब्बल २ लाख ७० हजार रुपये किमतीचे २७० किलो गांज्याची ओली झाडे तोडून ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वारांघुशी येथील कळम देवीच्या डोंगर दरीत मनोहर माधव घाणे, गोपाळा नामदेव लोटे, धोंडीराम चिंधू घाणे, चंदर देवराम लोटे या शेतकऱ्यांनी गांजाची झाडांची लागवड केली होती. याबाबत राजूर पोलिसांना गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती.   गुरुवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सदर घटनास्थळी तीन किलोमीटर गाडी जात नसल्याने डोंगरदरीत पायी जात कारवाई केली. यावेळी इतर पिकाबरोबर गांजाची झाडे आढळून आली. पथकाने गुरुवारी व शुक्रवारी या दोन दिवसांत घटनास्थळी जाऊन पथकाने झाडे ताब्यात घेतली. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.  

Web Title: Crime News Cannabis cultivation in Akole taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here