Home अकोले अकोले तालुक्यात या गावात गांजाची शेती लाखो रुपयांचा गांजा जप्त

अकोले तालुक्यात या गावात गांजाची शेती लाखो रुपयांचा गांजा जप्त

Crime News Cannabis worth lakhs of rupees seized in this village in Akole 

अकोले | Crime News: अकोले तालुक्यातील मोग्रस या गावात अवैधरित्या गाजांची लागवड करुन तिची मशागत करुन जवळ बाळगताना 3,64,500 रुपयांचा अवैध् गांजासह एका आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अकोले तालुक्यातील मोग्रस शिवारात दि. 7  सप्टेंबर 2021 रोजी ठाकरवाडी परिसरात शंकर काळु पारधी हा त्याचे वालवडीचे शेताचे बांधावर अवैधरित्या गांजाची लागवड करुन ती बाळगत असल्याची गोपनिय माहिती स.पो.नि. मिथुन घुगे यांना मिळाली.

Job vs Business in Hindi | Business Tips | व्यवसाय से लाखो कमावो, यह व्हिडियो मोटिवेशन

त्यानुसार पोलीस अधिक्षक अ.नगर, अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर, उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग यांना सविस्तर माहिती देवुन त्यांचे कडुन छाप्याबाबत परवानगी घेवुन सदर ठिकाणी राजपत्रीत अधिकारी नायब तहसीलदार श्री व्ही व्ही खतोडे, ,व स्टाफ यांच्या मदतीने कारवाई करण्यात आली. सदर ठिकाणी 24 किलो 300 ग्रॅम वजनाचे रुपये 3, 64, 500 रुपयांचे 16 गांज्याची लहान मोठी झाडे मिळुन आले. तसेच गांज्याची लागवड तसेच त्याची मशागत करणारा शंकर काळु पारधी रा मोग्रस ता अकोले जि अ.नगर याला ताब्यात घेण्यात आले आहे. अकोले पोलीस ठाण्यात गुरनं 344/2021 एन डी पी एस कायदा 1885 चे कलम 20(क)(ख)(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीला आज दिनांक 08.09.2021 रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची पोलीस कोठडी रवानगी करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास अकोले पोलीस करीत आहे.

Web Title: Crime News Cannabis worth lakhs of rupees seized in this village in Akole 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here