Home संगमनेर संगमनेर तालुक्यातील या गावात शेळी बोकडाचा बिबट्याने पाडला फडशा

संगमनेर तालुक्यातील या गावात शेळी बोकडाचा बिबट्याने पाडला फडशा

Sangamner Hajarwadi bibatya attack on goat 

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील हजारवाडी पानोडी येथे घराच्या समोरील अंगणात बांधलेल्या एक शेळी व बोकड यांच्यावर दोन बिबट्यांनी हल्ला करून ठार मारल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री साडे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले आहे.

याबाबत माहिती अशी की, हजारवाडी येथील सखाराम लक्ष्मण सानप यांची शेळी व बोकड घराच्या अंगणात बांधून ठेवले होते. सर्वजण झोपी गेले असता पहाटे तीन वाजेच्या सुमारास दोन बिबट्यांनी अंगणात बांधलेल्या बोकड व शेळीवर हल्ला केला. या हल्ल्यात शेळीचा जागीच फडशा पाडला तर बोकडला ठार करून डोंगराच्या बाजूला ओढत नेण्यात आले. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आल्याने तत्काळ वाडेकर यांनी घटनेचा पंचनामा केला.  

Web Title: Sangamner Hajarwadi bibatya attack on goat 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here