गोहत्या बंदी असूनही गायी, बैलांची हत्या सुरूच
श्रीरामपूर | Ahmednagar News: राज्यात गोहत्या बंदी असतानादेखील कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. गायी बैल वासरांची हत्या सुरूच आहे. श्रीरामपूरमध्ये जनावरांची तब्बल साडे चार हजार कातडी आढळून आली आहे. म्हणजेच नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणात जनावरांची हत्या झाली आहे.
श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्रमांक २ मध्ये पोलिसांनी ही कारवाई केली. जैनबनगर परिसरात एका गोदामात गोवंशीय जनावरांची कातडी ठेवलेली असून ती वाहनात भरण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा घातला असता तेथून चांद पठाण, बबलू कुरेशी (दोघे रा. श्रीरामपूर) व हाजी मुस्ताक (रा. नगर) यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून सोळा लाख पाच हजार रुपयांची गोवंश जातीच्या जनावरांची कातडी व आयशर टेम्पो जप्त करण्यात आला आहे. या आरोपींनी प्रक्रिया करून ही कातडी गोदामात साठवून ठेवली होती. विक्री करण्यासाठी नेण्याचा प्रयत्न सुरू असताना ते पकडले गेले. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीरामपूर व संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कत्तलखाणे सुरु असल्याने असे प्रकार घडत आहे. आरोपी पकडले जातात. मुद्देमाल जप्त केला जातो. मात्र हे गुन्हे पुन्हा पुन्हा घडतं असतात. यामुळे यंत्रणा यामध्ये सामील असल्याचे शंका व्यक्त केली जात आहे. श्रीरामपूरमध्ये एवढा साठा आढळून आल्याने किती जनावरांची हत्या झाली यातून स्पष्ट होत आहे.
Web Title: Ahmednagar News slaughter of cows and bullocks continues