Home अहमदनगर पिस्तुलाचा धाक दाखवत पत्रकाराकडे मागितली खंडणी व मारहाण

पिस्तुलाचा धाक दाखवत पत्रकाराकडे मागितली खंडणी व मारहाण

Crime News demanded ransom from the journalist and beat

श्रीगोंदे | Crime News: श्रीगोंदे तालुक्यातील येळपणे येथील पत्रकार प्रमोद आहेर यांना सहा जणांनी लोखंडी रॉड व लाकडी दांडके व बियरच्या बाटलीने मारहाण केली. त्यांच्याकडे एक लाखाची खंडणी मागितली. दोघांनी त्यांच्या डोक्याला पिस्तुल लावून कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी पत्रकार आहेर यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक ७ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता पत्रकार प्रमोद आहेर हे येळपणे येथील  खंडेश्वर कॉम्पुटर हे भावाचे दुकान बंद करून घराकडे जात असताना येळपणे पिसोरे रोडवरील मारुती मंदिराजवळ सुनील रामदास जाधव यांच्यासह पाच ते सहा जणांनी आहेर यांना अडवून मारहाण केली. तसेच त्यांच्या खिशातील सात हजार रुपये काढून घेतले.

Web Title: Crime News demanded ransom from the journalist and beat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here