Home अहमदनगर रक्कम दुप्पट करण्याच्या बहाण्याने दोन भोंदुनी घातला साडे चार लाखास गंडा

रक्कम दुप्पट करण्याच्या बहाण्याने दोन भोंदुनी घातला साडे चार लाखास गंडा

Crime News doubling the amount, two bhonduni put four and a half lakh ganda

श्रीगोंदा | Crime News: बँकेच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्ही रोख पैसे घेऊन या आम्ही ती रक्कम दुप्पट करून देतो असे आमिष दाखवून दोन भोंदुनी दत्तात्रय महादेव शेटे यांची साडे चार लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील हिरडगाव फाट्यावरील साईकृपा कारखान्याजवळ घडली.

याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दत्तात्रय शेटे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून दोघांजणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

येथे पहा: बेस्ट कॉमेडी जोक व्हिडियो

खरेदी करा: आपल्यासाठी खास अमेझॉन ऑफर 

याबाबत माहिती अशी की, करमाळा येथील दत्तात्रय शेटे यांना पैसेची गरज होती. त्यांना दोन अज्ञात व्यक्तींनी तुमच्यावर असलेले बँकेचे कर्ज फेडण्यासाठी तुम्ही रोख रक्कम घेऊन या आम्ही ती दुप्पट करून देतो असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून शेटे हे अमिषास बळी पडले. ते साडे चार लाख घेऊन १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास हिरडगाव फाट्यावर साईकृपा परिसरात आले. त्यानंतर दोन अज्ञात इसमांनी साडे चार लाख रुपये घेतले. शेटे याच्या हातात तांदूळ, लिबू, फुले ठेवून ती रक्कम गाडीच्या डिक्कीत ठेवली अन गाडीस प्रदिक्षणा घालण्यास सांगितले. यावेळी त्यांनी डिकीमधील रक्कम हातचलाकीने लंपास केली.

Web Title: Crime News doubling the amount, two bhonduni put four and a half lakh ganda

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here