संगमनेर: बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस पोलीस कोठडी
संगमनेर | Sangamner: साडे चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करणारा नराधम रोशन रमेश ददेल यास पोलिसांनी अटक केली असून त्याला दिनांक २० शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
ही घटना शुक्रवारी सायंकाळी शहरातील एका उपनगरात घडली. बालिकेची आई घरात झोपलेली असताना साडे चार वर्षाची चिमुकली घराबाहेर खेळत असताना तिला आरोपी रोशन याने घरात बोलावून अत्याचार केला. हा सर्व प्रकार बालिकेने आई वडिलांना सांगितला. त्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथे पहा: बेस्ट कॉमेडी जोक व्हिडियो
खरेदी करा: आपल्यासाठी खास अमेझॉन ऑफर
याबाबत माहिती अशी की, रोशन रमेश ददेल असे या तरुणाचे नाव आहे. तो मुळचा नेपाळ येथील असल्याचे समजते. पिडीत बालिकेचे कुटुंब संगमनेर येथे एका उपनगरात राहते. तिचे वडील शनिवारी कामावर गेले असता त्यांच्या पत्नीने मुलीला त्रास होत असल्याचे सांगितले. त्यानंतर ते घरी आले. घराशेजारी राहणाऱ्या रोशन चाचा याने शुक्रवारी दुपारच्या सुमारास मला घरी बोलावले होते असे पिडीत मुलीने आई वडिलांना सांगितले.
Web Title: Sangamner Accused of molesting girl remanded in police custody