Home अहमदनगर सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मुळा धरणात बुडून मृत्यू

सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मुळा धरणात बुडून मृत्यू

Ahmednagar News Young man drowns in mula dam

राहुरी | Ahmednagar News: राहुरी शहरातील एका हॉटेलात काम करणारे चौघे जन स्वातंत्र्यदिन सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुळा धरण (Mula Dam) पाहण्यासाठी गेले असता दोन जणांना थेट धरणाच्या पाण्यात पोहण्याचा मोह न आवरल्याने ते पाण्यात उतरले. मात्र खोल पाण्यात दोघेही गटांगळ्या घेऊ लागले. मासेमारी करणाऱ्या तरुणांनी प्रयत्न करीत एकास वाचविले मात्र दुसरा सवंगडी पाण्यात बुडाला. सोमवारी सायंकाळी त्याचा मृतदेह पाण्यावर रंगताना आढळून आला.

रावसाहेब भीमराज मते (वय 40, रा. मुलनमाथा, राहुरी) असे पाण्यात बुडून मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे तर बिरेंदरसिंग रावत (रा. उत्तराखंड) यास धरणात मासेमारी करणार्‍या तरुणांनी वाचविले.

येथे पहा: बेस्ट कॉमेडी जोक व्हिडियो

खरेदी करा: आपल्यासाठी खास अमेझॉन ऑफर 

हे दोघे पाण्यात बुडताना पाहून मासेमारी करणारे विकास गंगे व इंद्रजीत गंगे मदतीला धावून आले. त्यांनी बिरेंदरसिंग रावतला बुडताना वाचविले. मात्र तोपर्यंत मते पाण्यात बुडाला होता. काठावर उभे राहून दुर्घटना पाहत असणाऱ्या दोन मित्रांनी घाबरुन धूम ठोकली. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना घटनेची माहिती समजताच दुपारी तीन वाजता पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील, कॉन्स्टेबल अण्णासाहेब चव्हाण, संजय शिंदे घटनास्थळी दाखल झाले.

Web Title: Ahmednagar News Young man drowns in mula dam

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here